आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल फोन आहे. लहान मुलं, मोठी माणसं तसेच वयोवृद्ध लोकं सुद्धा आजकाल मोबाईल वापरताना दिसतात. मोबाईल फोन नसेल तर माणूस जगूच शकत नाही असं म्हणता येईल. कारण लोकं उठता बसता, चालता बोलता सतत फोनचा वापर करत असतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का? फोनच्या सतत वापरामुळे आपल्याला अनेक इजा पोहचतात.
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांची खेडमध्ये 19 मार्चला सभा
सतत फोन चेक केल्याने ब्रेन डॅमेज होऊ शकतो. आता तुम्हाला वाटेल हे कस? चला तर मग जाणून घेऊया याबद्दल. ब्रिटीश जर्नल ऑफ सायकॉलॉजीमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार, सतत फोन चेक केल्याने बौद्धिक क्षमता खालावते. यामुळे ब्रेनवर परिणाम होतो. ज्यामुळे ब्रेन स्लो काम करायला लागतो. त्यामुळं आपल्याला अनेक त्रास होतात. जसे की डोकेदुखी, एखादा निर्णय लवकर घेण्यास जमत नाही.
धक्कादायक! शिळे अन्न खाल्ल्यामुळे बारावीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
सारखा फोन चेक केल्याचे तोटे खालीलप्रमाणे –
- सतत फोनची सवय लागते. फोन पाहिल्याशिवाय जमत नाही.
- सतत डोकेदुखी होते
- मेंदूवर कंट्रोल राहत नाही
- वेळही वाया जातो