सोशल मीडियावर दररोज अनेक वेगेवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ आपल्याला आश्चर्यचकित करणारे असतात. काही व्हिडीओ हसवणारे गमतीशीर असतात तर काही व्हिडीओ अत्यंत भावनिक असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक भावनिक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी देखील भावुक झाले आहेत.
शेतकऱ्याची थट्टा! वांग्याला प्रति किलो मिळाला फक्त 27 पैसे दर
या व्हिडिओमध्ये दोन भावंड दिसत आहे. यामध्ये लहान भावाचा वाढदिवस साजरा केल्याचे दिसत आहे. मात्र हा वाढदिवस कोणताही महागडा केक कापून नाही तर चक्क भाकरीवर मेणबत्ती लावून साजरा केला जात आहे. वाढदिवसाला केक आणण्यासाठी पैसे नसल्याने लहान भावासाठी मोठ्या भावाने केक बनवला आहे. पैशांशिवाय देखील आपल्याला आनंद साजरा करता येतो असा महत्वाचा संदेश आपल्याला या व्हिडिओमधून मिळत आहे.
जेलमध्ये असलेल्या आदिलने केला राखी सावंतला फोन, म्हणाला, “मला एक संधी…”
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ photo_gram143 या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकरी अनेक वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओवर कमेंट करत एका युजरने लिहिले ‘हॅप्पी बर्थडे क्युट’ तर दुसऱ्या युजरने लिहिले ‘भावाचे प्रेम’ अशा अनेक वेगेवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडिओवर येत आहेत.
शेतातील पक्षी त्रास देतात म्हणून शेतकऱ्याने केला ‘हा’ देसी जुगाड; एकदा व्हिडीओ बघाच…