सध्या एक धक्कदायक माहिती समोर आली आहे. OYO चे संस्थापक रितेश अग्रवाल यांचे वडील रमेश अग्रवाल यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. गुरुग्राममधील एका उंच इमारतीवरून पडल्याने OYO चे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या दरम्यान घडली आहे.
मुंबई लोकल ट्रेनमध्ये कपलचा रोमान्स पाहून लोकंही हैराण, घटना कॅमेऱ्यात कैद; पाहा VIDEO
याबाबत OYO चे संस्थापक रितेश अग्रवाल यांनी माहिती दिली आहे. माहितीनुसार, रमेश अग्रवाल हे २० व्या मजल्यावर राहत होते यावेळी ते बाल्कनीमध्ये आले असता त्या ठिकाणाहून खाली पडून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ते वरून खाली पडल्यानंतर त्यांना ताबडतोब रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.
सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दिली धक्कदायक माहिती
रितेश अग्रवाल यांनी एक निवेदन जारी करत त्यांच्या वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे. “मी जड अंत:करणाने सांगू इच्छितो की माझ्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने माझं आणि माझ्या कुटुंबाचं मोठे नुकसान झाले आहे”. असे ते म्हणाले.
‘हाय झुमका वाली पोरं’ गाण्यावर गौतमीने पुन्हा गाजवलं मार्केट; पाहा VIDEO