दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) प्रमुख स्वाती मालीवाल यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. माझे वडीलच माझे लैंगिक शोषण करायचे असा मोठा गौप्यस्फोट स्वाती मालीवाल यांनी केला आहे. यांच्या या गौप्यस्फोटानंतर चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी महिला आयोगाने आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यात हा गौप्यस्फोट केला आहे.
कोरोनानंतर फ्लू आजाराने माजवलाय हाहाकार; ‘या’ ठिकाणी लॉकडाऊनची तयारी
यावेळी बोलताना स्वाती मालीवाल म्हणाल्या “मी लहान असताना माझ्या वडिलांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केले. ते मला खूप मारायचे त्यामुळे ते ज्यावेळी घरी यायचे त्यावेळी मी भीती पोटी पलंगाखाली लपायचे, असे यावेळी मालीवाल यांनी म्हटले आहे.
अबब! ‘या’ कोंबडीच एक अंड विकलं जातंय १०० रुपयाला; जाणून घ्या याबद्दल माहिती
त्याचबरोबर पुढे त्या म्हणाल्या, “माझे वडील मला खूप मारायचे. मी चौथीपर्यंत माझ्या वडिलांसोबत राहिले. त्यांनी माझ्यावर खूप अत्याचार केले यामुळे मी रात्रभर प्लॅन करत असे की जे पुरुष महिला आणि मुलींसोबत गैरवर्तन करतात त्यांना चांगला धडा शिकवेन, असे देखील यावेळी स्वाती मालीवाल यांनी म्हटले आहे.
नाद करा पण आमचा कुठं! पठ्ठ्याने बैलाच्या वाढदिवसाला चक्क गौतमी पाटीलला दिली सुपारी