सध्या होळीचा उत्सव सगळे आनंदात साजरा करत आहेत. दिल्लीतल्या पहाडगंज भागातला व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही मुलं ही एका जपानी तरूणीशी अश्लील वर्तन करताना दिसत होते. होळी खेळण्याच्या नावाखाली हे गैरवर्तन केलं गेलं. यानंतर आता दिल्ली पोलिसांनी देखील या प्रकरणाची दखल घेतली आहे. आता यावर त्या जपानी तरुणीने प्रतिक्रिया दिली आहे.
पुन्हा राज्यात पावसाची शक्यता; 13 ते 15 मार्चदरम्यान ‘या’ ठिकाणी पडणार पाऊस
आता यावर प्रतिक्रिया देत या तरुणीने एक ट्विट केलं आहे. ट्विट करत तिने लिहिले की, “मला भारताबद्दलचे सर्वकाही आवडत आहे. भारत हा एक आकर्षक देश आहे. भारत आणि जपान कायमचे ‘टोमोडाची’ (मित्र) राहतील.” असं या तरुणीने ट्विटमध्ये म्हंटल आहे.
しかしながら、この度は動画やTwitterを通じて多くの方にご心配をおかけしまして誠に申し訳ございませんでした。
— 🇮🇳めぐみこ (@megumiko_india) March 11, 2023
インドの良い面や楽しさを伝えることが目的でありながら、多方面に心配と不安を与えてしまった事を心からお詫び申し上げます。
本当にごめんなさい。
दरम्यान, या तरुणीसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली. त्याचबरोबर या प्रकरणी त्यांनी काही तरुणांना ताब्यात देखील घेतलं आहे.
कोरोनानंतर फ्लू आजाराने माजवलाय हाहाकार; ‘या’ ठिकाणी लॉकडाऊनची तयारी