मुकेश अंबानींच्या कुटुंबामध्ये कोण जास्त शिकलंय? वाचा सविस्तर…

Who is more educated in Munkesh Ambani's family? Read more...

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे देशातील दिग्गज उद्योजक म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे अफाट संपत्ती आहे. मुकेश अंबानींचे कुटुंब सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. त्याच्या कुटुंबाबद्दल नवनवीन गोष्टी जाणून घेण्यास लोक नेहमीच उत्सुक असतात. अंबानी कुटुंबातील लोकांचं किती शिक्षण झालं आहे याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.

होळीच्या दिवशी अश्लीलवर्तन झाल्यावर जपानी तरुणीने दिली प्रतिक्रिया, म्हणाली…

मुकेश अंबानी यांनी मुंबईतून केमिकल इंजिनीअरिंगमध्ये (Chemical Engineering) ग्रॅज्युएशन केलं आहे. पुढे ते MBA करण्यासाठी स्टॅनफोर्ड विद्यापीठात गेले. मात्र नंतर काही कामामुळे त्यांनी MBA च शिक्षण अर्थवट सोडलं. त्याचबरोबर मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून शिक्षण पूर्ण केलं आहे. मात्र नीता अंबानी यांना नृत्याची देखील आवड होती. त्यांनी त्यांच्या लग्नानंतर काही दिवस शिक्षिका म्हणून काम देखील केलं आहे. त्यांनतर त्या धीरूभाई अंबानी (Dhirubhai Ambani) शाळेचे संस्थापिका झाल्या.

पुन्हा राज्यात पावसाची शक्यता; 13 ते 15 मार्चदरम्यान ‘या’ ठिकाणी पडणार पाऊस

मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी (Isha Ambani) हिने साऊथ एशियन स्टडीज आणि सायकोलॉजीमध्ये पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याचबरोबर त्यांचा मोठा मुलगा आकाश 2013 मध्ये ब्राउन युनिव्हर्सिटी, यूएसए मधून बिझनेस-कॉमर्समध्ये पदवी शिक्षण घेतलं आहे. आकाश अंबानीची पत्नी पत्नी श्लोका मेहतानं प्रिन्सटन युनिव्हर्सिटी, न्यू जर्सी, यूएसए येथून मानववंशशास्त्र पदवी शिक्षण घेतलं आहे.

महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी केला मोठा गौप्यस्फोट; म्हणाल्या, “माझे वडीलच माझे लैंगिक शोषण करायचे”

त्याचबरोबर आता सध्या साखरपुड्यामुळे सतत चर्चेत असणाऱ्या अनंत अंबानी (Anant Ambani) यांनी र्‍होड आयलंडमधील ब्राऊन विद्यापीठातून पदवीच शिक्षण पूर्ण केलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या पत्नी राधिका मर्चंट-अंबानी (Radhika Merchant-Ambani) यांनी न्यूयॉर्क विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदवी घेतली आहे.

कोरोनानंतर फ्लू आजाराने माजवलाय हाहाकार; ‘या’ ठिकाणी लॉकडाऊनची तयारी

त्याचबरोबर अनिल अंबानी (Anil Ambani) यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूलमधून बिझनेझ ॲडमिनिस्ट्रेशनमधून मास्टर्स पूर्ण केलं आहे. आणि टीना अंबानी (Tina Ambani) यांनी आर्ट्समधून पदवी शिक्षण पूर्ण केलं असून त्यांनी वयाच्या २१ व्य वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

अबब! ‘या’ कोंबडीच एक अंड विकलं जातंय १०० रुपयाला; जाणून घ्या याबद्दल माहिती

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *