मागच्या काही दिवसापासून ठाकरे गट आणि राणे कुटुंब सोशल मीडियावर कायम चर्चेत आहे. ठाकरे आणि राणे कायम एकमेकांवर जोरदार टीका करत असतात. टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. यामध्ये कधी नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत तर कधी वैभव नाईक विरुद्ध नितेश राणे यांच्यामध्ये सारखे शाब्दिक वादविवाद चालूच असतात.
मोठी बातमी! शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांचा मॉर्फ केलेला व्हिडीओ व्हायरल
यामध्येच आता ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी नारायण राणे यांच्या मंत्रिपदाविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे. नारायण राणे यांच केंद्रीय मंत्रिपद दोन महिन्यात जाणार असा मोठा गौप्यस्फोट वैभव नाईक यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.
‘त्या’ व्हायरल व्हिडिओवर शीतल म्हात्रे यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “बाळासाहेबांचे संस्कार …”
वैभव नाईक म्हणाले, भाजपला राणेंची राजकीय दृष्टया गरज नाही. त्यामुळं राणेंना राजीनामा द्यावा लागणार असल्याचं यावेळी त्यांनी म्हंटल आहे. नाईक यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.
समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात; ५ जण जागीच ठार तर ७ जण गंभीर जखमी