शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी त्यांचा एक व्हिडीओ मॉर्फ करुन व्हायरल करण्यात आल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली आहे. याबाबत त्यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर आरोप केले आहे. शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांचा एक व्हिडीओ मॉर्फिंग करुन अश्लील संदेश लिहून व्हायरल करण्यात आला होता. यामुळे आता याप्रकरणी शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. याबाबत दहिसर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. आता या प्रकरणावर आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज आणि उद्या ‘या’ ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता!
आदित्य ठाकरे म्हणाले, “असे व्हीडिओ मॉर्फ कसे होऊ शकतात आणि नक्की काय झालं, हे देखील महत्त्वाचं आहे. कारण जर व्हीडिओ मॉर्फ होऊ लागले तर ते सर्वांसाठीच धोक्याचं आहे”, अशा शब्दांमध्ये आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
बिग ब्रेकिंग! शीतल म्हात्रे यांचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी दोन जणांना अटक
दरम्यान, शुक्रवारी झालेल्या रॅलीतला हा व्हिडीओ होता जो एडिट करुन अश्लील करण्यात आला होता. हा व्हिडीओ ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकारींनी फेसबुकवर मातोश्री नावाच्या पेजसह तो व्हिडीओ अपलोड करुन व्हायरल केल्याचा आरोप यावेळी म्हात्रे यांनी केला आहे.
नारायण राणे यांच मंत्रिपद जाणार, ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट