दिवसेंदिवस सोशल मीडियाचा ( Social Media) वापर वाढत आहे. लाईक, कमेंट आणि शेअरची भुरळ लोकांमध्ये आजकाल पहायला मिळते. यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर फोटो, व्हिडीओ पोस्ट करण्याची स्पर्धा युजर्समध्ये वाढली आहे. या स्पर्धेमुळे मानसिक ताण तर येतोच मात्र बऱ्याचदा मोठे नुकसान देखील होते. फोटो काढताना किंवा व्हिडीओ काढताना आजूबाजूला लक्ष न दिल्याने अपघात झाल्याचे व जीवावर बेतल्याचे तुम्ही अनेकदा वाचले असेल.
माधुरी दीक्षितचे ‘या’ दिग्गज क्रिकेटरसोबत होते अफेअर; वाचा अभिनेत्रीची Lovestory
सध्या सगळीकडे रंगपंचमीचा ( Rangoanchami 2023) जल्लोष सुरू आहे. यासाठी अनेक तरुण नदी घाटावर किंवा धरणावर रंग खेळण्यासाठी जातात. दरम्यान खेड तालुक्यातील काही तरुण सुद्धा भामा आसखेड धरणावर गेले होते. यावेळी धक्कादायक घटना घडली आहे. त्याच झालं असं की, दत्ता भारती हा तरुण रिल्स ( reels) बनवत असताना पाय घसरून धरणाच्या पाण्यात पडला.
RRR चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला मिळाला ऑस्कर अवॉर्ड!
यावेळी आजूबाजूच्या लोकांनी आरडा ओरडा केला. लोक गोळा झाल्यानंतर काही तरुणांनी दत्ता ला पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पाण्यात बुडाला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून याठिकाणी आपत्ती निवारण टीमला पाचारण करण्यात आले. यानंतर दत्ता भारतीला शोधण्यात आले. मात्र त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. शेवटी काय तर थोड्या वेळेची मजा दत्ता भारतीच्या जीवावर बेतलीय!
शीतल म्हात्रे यांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओप्रकरणी आदित्य ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…