बागेश्वर बाबा सध्या चांगलेच चर्चेत आहेत. मोठ्या वादात अडकून देखील बागेश्वर बाबांकडे जाणाऱ्या भाविकांचा ओघ कमी झालेला नाही. मध्य प्रदेशातील छतरपूरमधील बागेश्वर धाममध्ये (Bageshwar Dham) मोठ्या संख्येने लोक गाऱ्हाने घेऊन पोहोचतात. त्याच्या वक्तव्यांमुळे बागेश्वर बाबा सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात.
आदित्य ठाकरेंची फडणवीसांवर जोरदार टीका; म्हणाले, “समोर आलेल्या भ्रष्टाचारावर…”
सध्या त्यांचं एक वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे. हिंदूंच्या घरात दोन मुले असतील तर एका मुलाला रामनवमीच्या मिरवणुकीत पाठवा. आणि जर चार मुले असतील तर दोन मुलांना रामनवमीच्या मिरवणुकीत पाठवा, असं वक्तव्य धीरेंद्र शास्त्री यांनी केलय. त्यामुळे आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
श्रीगोंदा तालुक्यातील लोणीव्यंकनाथमध्ये दोन चिमुकल्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू
रामलीला मैदानावरील एका उदघाटन समारंभात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्याचबरोबर ते यावेळी बोलताना म्हणाले, “परिस्थिती कोणतीही असली तरी, सर्व हिंदूंनी एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे” असं ते यावेळी म्हणाले आहेत.
नवऱ्याला सुट्टी मिळत नाही म्हणून बायकोने केलं थेट झोपून ठिय्या आंदोलन!