सैराट, फँड्री, नाळ आणि झुंडच्या यशानंतर प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व लेखक नागराज मंजुळे यांचा घर बंदूक बिर्याणी हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात आकाश ठोसर, सयाजी शिंदे, सायली पाटील हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. येत्या 7 एप्रिलला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या प्रमोशन साठी ‘घर बंदूक बिर्याणी’ ( Ghar Banduk Biryani) च्या टीमने महाराष्ट्र दौरा सुरू केलाय.
दरम्यान घर बंदूक बिर्याणीच्या टीमने आज बारामती येथील तुळजाराम चरतुरचंद महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी या संपूर्ण टीमने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच नागराज मंजुळे यांनी काही अनुभव सांगत आपल्या आयुष्याची पाने सर्वांसमोर उलगडली.
कार्यक्रमा दरम्यान अपयश आल्यानंतर काय करावे? असा प्रश्न विचारण्यात आला असता नागराज मंजुळे म्हणाले की, याठिकाणी सर्वात जास्त अपयशी माणूस जर कोणी असेल तर तो मी आहे. आजपर्यंत अनेक अपयशाचे क्षण पचवून मी पुढे आलो आहे. कितीही अपयश आले तरी थांबू नका. प्रामाणिकपणे काम करत रहा. तुम्हाला नक्की यश मिळेल.
शरद पवार यांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ‘या’ महिला नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश
आयुष्यात एक काळ असा होता की मी रस्त्यावर हातात वही घेऊन त्यावर काहीतरी खरकटत बसलेलो असायचो. त्यावेळी मला खास भेटायला येणारे कोणीच न्हवते आणि आज असा काळ आहे की कोणाला भेटायचे असेल तर इच्छा असूनही मला वेळ नाहीय. असे देखील नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यावेळी म्हणाले आहेत.
घर बंदुक बिर्याणी या चित्रपटाबद्दल बोलताना ते म्हणाले की, ” सैराट,नाळ, फँड्री आणि झुंड या चित्रपटांपेक्षा ‘घर बंदूक बिर्याणी’ हा चित्रपट वेगळा आहे. यामध्ये काहीतरी नवीन तुम्हाला पहायला मिळणार असून इतर चित्रपटांसारखे ते सुद्धा तुम्हाला नक्की आवडेल. “