सध्या कोरोनाचे संकट कमी झालेले आहे. कोरोनानंतर आता कुठं सर्व गोष्टी सुरळीत चालल्या होत्या. यामध्येच आता H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसने संपूर्ण देशासह महाराष्ट्राचे देखील टेन्शन वाढविले आहे. महाराष्ट्रात मध्ये सध्या 170पेक्षा जास्त रुग्ण H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसने बाधित आहेत. यामध्येच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नेमकी काय आहे जुनी पेन्शन योजना? जाणून घ्या याबद्दल सविस्तर
देशातील तिसरा आणि महाराष्ट्रातील पहिल्या H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरस बाधित रुंगांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एमबीबीएसच शिक्षण घेणार्या 23 वर्षीय तरुणाचा नगरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे देशासह महाराष्ट्राचं देखील टेन्शन वाढलं आहे.
सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई कडून धमकी; “त्या प्रकरणी माफी मागावी अन्यथा…”
माहितीनुसार, मृत्यू झालेला तरुण हा औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी असून तो नगरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होता. महाराष्ट्रामधील H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसचा हाच तरुण पहिला मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं आहे.