‘अन्न हेच पूर्णब्रह्म’ असे भारतीय संस्कृतीत सांगितले जाते. मात्र तरीदेखील आपल्या आजूबाजूला अन्नाची नासाडी होताना पहायला मिळते. देशात एकीकडे दोन वेळचे अन्न न मिळणारे लोक आहेत तर दुसरीकडे जास्तीचे अन्न घेऊन वाया घालवणारे लोक आहेत. हॉटेल्स, लग्नसमारंभ व विविध कार्यक्रमांच्या ठिकाणी अन्नाची नासाडी मोठ्या प्रमाणात पहायला मिळते.
बिग ब्रेकिंग! अहमदनगरमध्ये H3N2 चा पहिला रुग्ण दगावला, महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं
दरम्यान अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून इंदोर ( Indaur) मधल्या एका हॉटेल चालकाने अनोखी शक्कल लढवली आहे. या हॉटेलमध्ये अन्न वाया घालवणाऱ्या लोकांना दंड ठोठावला जातो. या ठिकाणी जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर अन्न संपवले नाही तर 50 रुपये दंड भरावा लागतो. लोकांनी आपल्या ताटात अन्न ( Food) वाया घालवू नये. अशा प्रकारच्या सूचना या हॉटेलमध्ये देण्यात आल्या आहेत.
हनी सिंगने फक्त गाडीच्या नंबरसाठी खर्च केले होते ‘इतके’ लाख रुपये; आकडा वाचून व्हाल थक्क
यासाठी हॉटेलच्या भिंतीवर एक पोस्टर चिटकवण्यात आले असून त्यावर ‘ स्वस्तात मस्त जेवण करा मात्र अन्नाची नासाडी केल्यास 50 रुपये दंड आकारण्यात येईल.’ असे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे या हॉटेलमध्ये फक्त 60 रुपयांत अनलिमिटेड जेवण मिळते. लोकांना अन्नाचा अपव्यव न करण्याची सवय लागावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे हॉटेलचे मालक अरविंद सिंग कर्णावत यांनी सांगितले आहे.