बदलत्या काळासोबत लोकांची हौसमौज करण्याची व्याख्या देखील बदलत आहे. आधीच्या काळात लग्नात एक फोटो काढणे मुश्किल होते. इतकंच काय फोटो काढलेच तर नवरा नवरी ठराविक अंतर ठेऊन उभे राहायचे. परंतु, आता काळ बदलला आहे. आयुष्याच्या महत्त्वाच्या सोहळ्यातील आठवणी जपून राहाव्यात व भावी वर-वधू लग्नाआधी एकमेकांसोबत कम्फर्टेबल व्हावे. यासाठी लोक विविध प्रयत्न करतात. लग्नापूर्वी फोटोशूट करणे ( Pre wedding shoot) ही यातूनच जन्माला आलेली एक संकल्पना!
मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन अजित पवार संतापले; म्हणाले, “गलिच्छपणाचं कामकाज…”
या फोटोशूटचे देखील भरपूर किस्से असतात. यातील भरपूर किस्से तुम्ही सोशल मीडियावर पाहिलेही असतील. @clicography च्या सूधबुध रिल्सने ( Sudh budh boy reels) तर याचे अनेक किस्से प्रसिद्ध केले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ते व्हायरल देखील झाले आहेत. दरम्यान सध्या सोशल मीडियावर असाच प्रीवेडिंगचा एक गमतीदार व्हिडिओ व्हायरल होतोय.
“मी साताऱ्याची गुलछडी…”, गाण्यावर थिरकली गौतमी पाटील; पाहा व्हायरल व्हिडीओ
या व्हिडीओ मध्ये एका शेतात नवरी मुलीचे प्रीवेडिंग शूट सुरू आहे. यावेळी फोटोग्राफर तिला एका छोट्या वाटेवरून लेहेंगा पकडून चालायला सांगतो. यावर ती म्हणते,” भैया एवढ्या छोट्या वाटेवरून मी कसे चालणार ?” यावेळी फोटोग्राफर तिला स्वतःच चालून दाखवतो. मात्र यावेळी तो धपकन पडतो. यावर त्याला सगळेच खूप हसतात. @kannu_mishraji या आयडीवरून हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या व्हिडीओला युजर्सनी चांगलीच पसंती दर्शवली असून विविध मजेशीर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
Jio ची भन्नाट ऑफर! एकाच रिचार्जमध्ये चालवा चार मोबाईल