भारतीय क्रिकेट संघातील उत्कृष्ट् खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या गाडीचा ३० डिसेंबर रोजी भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये खेळाडू ऋषभ पंत गंभीर जखमी झाला होता. यांनतर त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया देखील झाल्या. यांनतर डॉक्टरांनी ऋषभला आराम करण्यास सांगितले आहे. दरम्यान आता ऋषभचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
राडाच! गौतमी पाटील नाचणार शिंदेशाही तालावर; डॉ. उत्कर्ष शिंदेंनी दिली माहिती
ऋषभने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून स्विमिंग पुलमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडीओवरून पंतची रिकव्हरी योग्य दिशेने सुरू असून तो लवकरच क्रिकेटच्या मैदानात परतणार असल्याचे दिसत आहे. यामुळे चाहत्यांमध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
मोठी बातमी! सलमान खानची सुरक्षा वाढणार, पाहा नेमकं काय आहे प्रकरण?
सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओवर नेटकरी वेगेवेगळ्या प्रतिक्रया देत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘2023 odi wc साठी तयार रहा’ तर दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘मिस यू ऋषभ पंत सर’ त्याचबरोबर अजून एका युजरने लिहिले की, ‘लवकर बरे व्हा चॅम्प’ , अशा अनेक वेगेवेगळ्या प्रतिक्रिया नेटकरी या व्हिडिओवर देत आहेत.