मागील काही दिवसांपासून ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत आहेत. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय व जवळच्या विश्वासू नेत्यांनी शिंदे गटात केलेला प्रवेश यामुळे ठाकरे गट आधीच हवालदिल झाला आहे. अशातच ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत ( Dipak Sawant) यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.
पाठीवर जखम अन् ऋषभ पंतचा स्विमिंग पूलमध्ये कुल अंदाज; पाहा VIDEO
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दीपक सावंत यांनी शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे. शिवसेनेचे मुख्यालय बाळासाहेब भवन येथे हा पक्षप्रवेश झाला. मागील काही दिवसांपासून दीपक सावंत हे ठाकरे गटावर नाराज आहेत अशी चर्चा रंगली होती. उद्धव ठाकरे व दीपक सावंत यांच्यात अंतर्गत वाद सुरू असल्याचे देखील सांगितले जात होते. यामुळेच दीपक सावंत यांनी शिंदे गटात प्रवेश केला असल्याचा अंदाज आहे.
राडाच! गौतमी पाटील नाचणार शिंदेशाही तालावर; डॉ. उत्कर्ष शिंदेंनी दिली माहिती
दरम्यान शिवसेनेचे ( ठाकरे गट) जेष्ठ नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी दोन दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला होता. यानंतर आता दीपक सावंत यांनी ठाकरे गटाची साथ सोडली आहे. यामुळे ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला चांगलाच धक्का बसला आहे. ठाकरे गटातील महत्त्वाचे व एकनिष्ठ नेते शिंदे गटात जात असल्याने पक्षाची फळी डळमळीत होत आहे.
मोठी बातमी! सलमान खानची सुरक्षा वाढणार, पाहा नेमकं काय आहे प्रकरण?