सोने हा सर्वात महाग धातूंपैकी एक आहे. सोन्याचे विविध दागिने लोकांना घालायला आवडतात. मात्र सोन्याच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. दरम्यान भारतीयांना तर सोन्याचे फारच आकर्षण आहे. यामुळेच भारतात सोन्याची तस्करी होण्याचे प्रकार नेहमी होताना पहायला मिळतात. यासाठी लोक वेगवेगळी शक्कलही लढवत असतात.
मोठी बातमी! महाराष्ट्राच्या राजकारणात ‘गौतमी पाटील’ ची चर्चा; ‘या’ नेत्याने केले गंभीर वक्तव्य
बुधवारी ( ता.15) बंगळुरू (Benglore) येथे एक तस्करीचे प्रकरण समोर आले. याठिकाणी सोन्याची तस्करी करणाऱ्या व्यक्तीने अतिशय भन्नाट कल्पना अंमलात आणली होती. या व्यक्तीने सोने ( Gold) कोठे लपवले होते हे वाचून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल.
बिग ब्रेकिंग! पुण्यात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात
कैंपागोंडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही घटना घडली आहे. याठिकाणी बँकॉकमधून आलेल्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाने हा पराक्रम केला आहे. या प्रवाशाच्या चपलेमध्ये कस्टमच्या अधिकाऱ्यांना सोने सापडले. या सोन्याचे वजन 1. 2 किलो इतके होते.
#WATCH | Gold weighing 1.2 kg worth Rs 69.40 lakh seized from a slipper of a passenger who arrived from Bangkok in Bengaluru by IndiGo flight: Customs pic.twitter.com/4dBwb5Dhpv
— ANI (@ANI) March 15, 2023
तसेच या सोन्याची किंमत 68 लाख 40 हजार इतकी आहे. विशेष म्हणजे ही चप्पल वरून दिसायला अगदी साधी होती. मात्र या चपलेचे वजन संशयास्पद वाटल्याने चपलेचा सोल फाडला व त्यामध्ये सोने आढळून आले. या व्यक्तीवर कारवाई सुरू आहे.
ठाकरे गटाला आणखी एक जबरदस्त धक्का; देसाईंपाठोपाठ ‘या’ बड्या नेत्याने केला शिंदे गटात प्रवेश