
पुण्यात ( Pune) एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. पतीने पत्नीची व मुलाची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याचा प्रकार याठिकाणी घडला आहे. सुदिप्तो चंद्रशेखर गांगुली असे या व्यक्तीचे नाव असून तो एक आयटी इंजिनिअर होता. अतिशय प्रेमळ व संवेदनशील असणाऱ्या या कुटुंबाच्या जाण्याने आजूबाजूच्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोल्हापूरमधील तरुणीची आत्महत्या; तरुणाच्या त्रासाला कंटाळून घेतला निर्णय
त्याच झालं असं की बंगळूर येथे राहत असलेल्या सुदीप्तो यांच्या लहान भावाने मंगळवारपासून त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र फोन न उचलला गेल्याने त्याने आपल्या मित्राला सुदीप्तोच्या घरी पाठवले. यावेळी घराचा दरवाजा बंद असल्याने त्याने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गायब असल्याची तक्रार दिली.
भर उन्हामध्ये झाली ढगफुटी? व्हिडीओ पाहून डोकं चक्रावेल; पाहा VIDEO
तपासादरम्यान पोलिसांना सुदीप्तो यांचे फोन लोकेशन ते राहत असलेल्या ठिकाणी मिळाले. म्हणून पोलिसांनी सुदीप्तो यांच्या घरी जाऊन दरवाजा उघडला. यावेळी एका खोलीत सुदीप्तोची पत्नी प्रियांका व त्यांचा मुलगा तनिष्क यांचा मृतदेह आढळला. विशेष म्हणजे त्यांचा चेहरा प्लास्टिकने बांधलेला होता.
आत्ताची सर्वात मोठी बातमी! अमृता फडणवीस फसवणूकप्रकरणी डिझायनर महिला पोलिसांच्या ताब्यात
तसेच दुसऱ्या खोलीत सुदीप्तोचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. यामुळे सुदीप्तोने पत्नी आणि मुलाचा खून करून गळफास लावून घेतल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सुदीप्तोने काही दिवसांपूर्वी आपली चांगल्या पगाराची नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता. परंतु यामध्ये त्यांना हवा तसा नफा होत न्हवता. यामुळे सुदीप्तोने आर्थिक विवंचनेतून हे पाऊल उचलले असावे अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ( Sucide Case)
कृष्णापुर ते ढाणकी नाला रुंदीकरण व खोलीकरण प्रशासनाकडे वारंवार निवेदन करूनही अद्याप मंजूर केले नाही!
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सुदीप्तोच्या घरातील एका कोलाजमध्ये प्रेम व कुटुंबावर खूप छान लिहिले आहे. यातून त्याचे त्याच्या कुटुंबाप्रति प्रेम दिसून येत आहे. अशा माणसाने असे टोकाचे पाऊल उचलेल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
Video: “नागराज मंजुळे आणि सयाजी शिंदे अॅक्शन मोडमध्ये तर…”, घर बंदूक बिरयानी’ चा ट्रेलर पाहिला का?