मुंबई : सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्यासह आणखी १३ जणांविरोधात लूक आऊट नोटीस जारी (Look Out Circular LOC) केली आहे.ही कारवाई दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी करण्यात आली आहे.
Sudha Murti : पद्मश्रीने सन्मानित सुधा मूर्तींचा प्रेरणादायी प्रवास ; वाचा सविस्तर
यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.यावेळी केजरीवाल म्हणाले की, ज्या वेळी सामान्य माणूस महागाईशी झुंज देत आहे, कोट्यवधी तरुण बेरोजगार आहेत, अशा वेळी केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांसह बेरोजगारी आणि महागाईशी लढायला हवे. केंद्र सरकार (Central government)दररोज सीबीआय ईडीचा खेळ सुरू करतय मग अशावेळी देशाची प्रगती कशी होणार?
Eknath Shinde: नेमका काय उद्देश आहे शिंदे सरकारचा दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याचा
या प्रकरणात भाजपचे प्रवक्ते गौरव भाटी (Gourav Bhati)यांनी उडी घेतली असून ते म्हणाले की देशातील जनतेच मत आहे की, सर्वात मोठा भ्रष्टाचारी कोणी असेल तर तो मनीष सिसोदिया आणि आम आदमी पक्ष आहे.पुढे भाटी म्हणाले की, भाजपने केजरीवाल सरकारला प्रश्न विचारला की, आम आदमी पक्षाचे उत्पादन शुल्क धोरण योग्य होते, तर ते मागे का घेतले? तसेच कोविडच्या दुसऱ्या लाटेत केजरीवालांनी औषधे, बेड, ऑक्सिजन व्यवस्थेकडे लक्ष द्यायचे होते, पण ते भ्रष्ट लेखणी अबकारी धोरणावर सही करण्यात गुंतले होते
Tamhini Ghat : ताम्हिणी घाटात भीषण अपघात, कार 200 फूट घसरली, 3 जण जागीच ठार