सध्या पिंपरी चिंचवड शहरातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इंजिनिअर तरुणाने चांगल्या पगाराची नोकरी असूनही मला आनंद मिळत नाही’ असं म्हणून आत्महत्या केली आहे. या तरुणाने इमारतीच्या 11 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे तेथील परिसरात खळबळ उडाली आहे.
राज्यामध्ये पुन्हा सत्ताबदल? बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सूत्रांच्या माहितीनुसार, विरेन जाधव असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. हा तरुण फक्त 27 वर्षाचा आहे. विरेन जाधव हा टाटा मोटर्समध्ये इंजिनिअर या पदावर कार्यरत असून त्याला पगार देखील चांगला होता. मात्र ‘चांगला पगार असून देखील आनंद मिळत नाही’ म्हणून विरेनने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
ब्रेकिंग! ‘या’ देशाने देखील घातली टिकटॉक अॅपवर बंदी
वीरेन जाधव हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहे. मात्र सध्या तो आपल्या आईसोबत चिखली परिसरातील रिव्हर रेसिडेन्सी या सोसायटीमध्ये आपल्या राहत होता. वीरेनच्या जाण्याने त्याच्या आईला देखील मोठा धक्का बसला आहे.
मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज खेडमध्ये जाहीर सभा