भारताचा स्टार क्रिकेटपटू ( Star cricketer) विराट कोहलीचे फक्त भारतातच नाहीत तर जगभरात प्रचंड चाहते आहेत. त्याच्या जबरदस्त व्यक्तिमत्त्वामुळे तो कायम चर्चेत असतो. विराट-अनुष्का ( Virat-Anushka) च्या लग्नापासून त्यांच्या मुलीपर्यंत सतत काही न काही अपडेट येतच असतात. आज आपण त्यांच्या काही महागड्या वस्तूंची माहिती घेऊयात.
रिंकू राजगुरूचा नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ; व्हिडीओ एकदा पाहाच
फॅशन लेबल
विराट कोहलीची पत्नी अनुष्का कोहली ही एका फॅशन ब्रँड ची मालकीण आहे. 2017 साली तिने स्वतःचे फॅशन लेबल लाँच केले होते. अनुष्काच्या या ब्रँड ची किंमत सध्या 65 कोटी इतकी आहे.
गुरुग्रामधील हवेली
गुरुग्रामच्या डीएलएफ फेज १ मध्ये या कोहली दांम्पत्याचा तब्बल 80 कोटींचा बंगला आहे. हा बंगला 10000 चौरस मीटर परिसरात असून सध्या विराटचे कुटुंब या हवेलीत राहते.
वडिलांच्या निधनानंतर मी गायी विकून एक एकर जमीन घ्यायचो; अजित पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा
अपार्टमेंट फ्लॅट
विराट आणि अनुष्काचा मुंबई मधील वरळी येथे एक फ्लॅट आहे. हा फ्लॅट 7000 चौरस मीटर परिसरात असून तो 35 व्या मजल्यावर आहे. या फ्लॅट ची किंमत जवळपास 34 कोटी इतकी आहे.
बेंटले कॉन्टिनेंटल जीटी
बेंटले कॉन्टिनेंटल जीटी ही विराटच्या गॅरेजमधील सर्वात महागडी कार आहे. विराटने २०१८ मध्ये ही कार खरेदी केली होती. या कारची किंमत सुमारे 3.8 कोटी इतकी आहे. ही कार ताशी 318 किलोमीटर वेगाने धावू शकते.
अमृता फडणवीस यांचं शिक्षण किती झालं आहे? आईवडील काय काम करतात? जाणून घ्या याबद्दल माहिती
रोलेक्स कॉस्मोग्राफ डेटोना रेनबो एव्हरबो गोल्ड
विराट कोहलीकडे 8.6 लाखांचे घड्याळ आहे. विराटला महागड्या घड्याळांचा प्रचंड नाद असल्याने, हे घड्याळ त्याने घेतले आहे. या घड्याळाव्यतिरिक्त लाखोंच्या किमतींची अजून घड्याळे विराट कोहलीकडे आहेत.