मागच्या काही महिन्यांपूर्वी वांद्रेच्या बॅंड स्टॅंड या परिसरामध्ये सलमानचे वडील सलीम खान हे सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांच्या बाजूला कोणी ही चिठ्ठी ठेवून जीवे मारण्याची धमकी दिली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.
विराट कोहली आणि अनुष्काकडे आहेत ‘या’ कोट्यवधी गोष्टी; वाचून तुम्हीही व्हाल थक्क
यावेळी सलमान खानला धमकीची चिट्ठी नाही तर यावेळी सलमानला ईमेल करत धमकी देण्यात आली आहे. सलमानला देण्यात आलेल्या धमकीच्या मेलमध्ये दिल्लीच्या तुरुंगात असलेला गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा उल्लेख आहे. हा मेल सलमानला आला नसून त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या ईमेलवर हा मेल आला आहे. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.
भर रस्त्यात तरुणाने महिलेला बेदम मारहाण करत बसवलं गाडीत; पाहा VIDEO
मीडिया रिपोर्टनुसार, आता मुंबई पोलिसांनी सलमानच्या सुरक्षेचा आढावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून सलमानची सुरक्षा वाढवली जाऊ शकते.
रिंकू राजगुरूचा नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ; व्हिडीओ एकदा पाहाच