राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस (Davendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी एका डिझायनर विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली होती. डिझायनर महिलेने अमृता फडणवीस यांना 1 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी अमृता फडणवीस यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
“…त्याशिवाय सरकार वठणीवर येणार नाही”, अजित पवार कडाडले
अनिक्षा या डिझायनरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी अनिक्षाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होते मात्र तिचे वडील बुकी अनिल जससिंघानी फरार होते मात्र आता त्यांना अटक झाल्याची माहिती सामोर आली आहे.
मार्केटमध्ये आलाय ‘मटका डोसा’, डोसा बनवण्याची पद्धत पाहून लोक म्हणाले…
माहितीनुसार, बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली असल्याची माहिती समोर आली आहे. अमृता फडणवीस यांना लाच ऑफर केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अनिल जयसिंघानी हा फरार होता. ANI ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
व्हॉट्सअॅपने आणले भन्नाट फीचर! आता फोटोमधून कॉपी करता येणार टेक्स्ट