आजकाल सर्व आर्थिक व्यवहार ऑनलाइन होत असले तरी देखील नोटा हा चलनातील एक महत्त्वाचा भाग आहे. आपल्या कडे 10 रुपयांपासून 2000 रुपये पर्यंतच्या नोटा असतात. नोटांचा बाबतीत एक मोठी समस्या म्हणजे फाटक्या नोटा ! बऱ्याचदा दुकानात किंवा इतर ठिकाणी नकळत फाटक्या नोटा आपल्या पदरात पडतात. या नोटा अनेक ठिकणी चालतही नाहीत. अशा वेळी फाटक्या नोटा ( torn notes) बदलून घेणे हा एक मोठा टास्क असतो.
शेतकऱ्यांची चिंता काही थांबाना! 24 मार्चनंतर पुन्हा अवकाळीचा पावसाचा इशारा…
फाटक्या नोटा बदली करून घेण्यासाठी आपण बऱ्याचदा दुकानात देखील जातो. मात्र त्यासाठी कमिशन घेतले जाते. मात्र बँकेत सुद्धा या नोटा बदळून मिळतात. तुमच्या कडे अशा फाटक्या नोटा असतील तर तुम्ही बँकेत जाऊन फाटलेल्या नोटांऐवजी जुन्या नोटा घरी आणू शकता. परंतु, जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेने ठराविक मर्यादा देखील निश्चित केली आहे.
पाकिस्तान, अफगाणिस्तामध्ये भूकंपाने 9 ठार तर 100 हून अधिक लोक गंभीर जखमी
कोणत्याही खासगी बँकेत व राष्ट्रीयकृत बँकेत ( Private or in any nationalised bank) फाटलेल्या नोटा बदलून मिळतात. सरकारी, प्रादेशिक व ग्रामीण बँकेत ही सेवा उपलब्ध नसते. महत्त्वाची बाब म्हणजे नोटा बदलून घेण्यासाठी तुमचे बँकेत खाते असणे देखीक गरजेचे नाही. तुम्ही एका वेळी फक्त 20 नोटा बदलून घेऊ शकता. यामध्ये सुद्धा अशी मर्यादा आहे की या 20 नोटांची किंमत जास्तीत जास्त 5000 रुपये असावी. यापेक्षा जास्त रकमेसाठी बँक खाते आवश्यक असून बँक थेट खात्यात पैसे जमा करते.
गुढी उभारताना कलश उलटा का ठेवला जातो? ‘हे’ आहे खरे शास्त्रीय कारण