उन्हाळा म्हंटल की गोड रसरशीत आंब्यांची ( Mango) चाहूल लागते. सध्या हळूहळू वाढत जाणाऱ्या उन्हाळ्यासोबत बाजारात आंब्याची लगबग वाढली आहे. दरम्यान नवी मुंबई मार्केटमध्ये आंब्यांचा राजा म्हणजेच हापूस आंब्याची आवक वाढली आहे. नवी मुंबई मधील एपीएमसी मार्केटमध्ये दररोज 60 ते 65 हजार आंब्यांच्या पेट्या येत आहेत. यामुळे आंब्यांच्या दरात घसरण झालेली पहायला मिळत आहे.
मोदींविरोधात पोस्टर लावणे पडले महागात; ६ जणांना झाली अटक
मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी गुढीपाडव्याला मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याच्या पेट्यांची आवक झाली आहे. यामध्ये कोकणातील ( Kokan) रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधून 45 हजार हापूस पेटी येत आहेत तर तामिळनाडू, कर्नाटक व आंध्रप्रदेशमधून 15 ते 20 हजार पेट्या येत आहेत. यावर्षी राज्यात अवकाळी पाऊसामुळे सर्वच ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. मात्र कोकणमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नाही.
13 वर्षाची मुलगी बनली ऑडी क्यू 3 ची मालकीण; गाडीची किंमत वाचून तुम्हीही व्हाल थक्क!
याचाच परिणाम म्हणून आंब्याचे उत्पादन चांगले आहे. दरम्यान यावर्षी हंगामाच्या अगदी सुरुवातीलाच आंब्याची मोठी आवक झाल्याने एप्रिलमध्ये आवक कमी होण्याची शक्यता आहे. सध्या पिकलेला हापूस आंबा 600 ते 1600 रुपये डझन असा विकला जात आहे. तर, हिरवा आंबा 400 ते 1000 दराने विकला जात आहे. सध्या आंब्याची आवक वाढल्याने आंब्याचे दर घसरले आहेत. यामुळे आंबा सर्वसामान्य लोकांना परवडणार आहे.