सिंह हा जंगलाचा राजा समजला जातो. बहुतेक प्राणी सिंहाला घाबरून असतात. त्यातल्या त्यात कुत्रे तर जास्त! कारण सिंहासारख्या ( Lion) बलाढ्य प्राण्यासमोर कुत्र्याचा निभाव लागणे कठीणच असते. मात्र सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यामध्ये चक्क कुत्र्यांनी सिंहाला पळवून लावले आहे.
गुढीपाडव्याला सर्वसामान्यांसाठी हापूस आंबा स्वस्त मात्र उत्पादकांची परवड!
हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील अगदी थक्क व्हाल. यामध्ये गावातील रस्त्यावर भक्ष्याच्या शोधात आलेल्या सिंहाला काही कुत्र्यांनी ( Dogs) हाकलून लावले आहे. हा प्रकार रात्रीच्या अंधारात घडला असून कुणीतरी अत्यंत चलाखीने व्हिडीओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.
गौतमी पाटील म्हणजे पावसाळ्यात उगवणारी छत्री; तमाशा परिषदेच्या अध्यक्षांनी केली जोरदार टीका
व्हायरल झालेला हा व्हिडीओ गुजरात ( Gujrat) राज्यातील सोमनाथ गिर येथील आहे. @nareshsinh_007 या ट्विटर अकाउंट वरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून यावर युजर्सनी विविध प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
मोदींविरोधात पोस्टर लावणे पडले महागात; ६ जणांना झाली अटक
જંગલના રાજા ઉભી પૂંછડીએ નાઠા ?
— Naresh Parmar (@nareshsinh_007) March 22, 2023
સિંહ પાછળ શ્વાનની દોડ
ડાલામથ્થાને વફાદારે દોડાવ્યા#viral #viralvideo #Lion #Lions #dogs #gir #Gujarat pic.twitter.com/3kZ7tzHEQ9
सिंहाला चलाखीने हाकलून लावणाऱ्या या कुत्र्यांना पाहून गली के ‘कुत्ते भी शेर होते हैं’ या प्रचलित म्हणीचा प्रत्यय येत आहे. दरम्यान, या व्हिडीओच्या निमित्ताने पुन्हा एकदा ‘जंगली प्राण्यांची मानवी अधिवासात होणाऱ्या शिरकावाची समस्या’ प्रकाशात आली आहे.
13 वर्षाची मुलगी बनली ऑडी क्यू 3 ची मालकीण; गाडीची किंमत वाचून तुम्हीही व्हाल थक्क!