
शिवसेना आणि धनुष्यबाण यावरून शिंदे आणि ठाकरे गटात (Shinde and Thackeray group) मागच्या काही दिवसापासून अनेक वाद चालू आहेत. या वादावर अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. मात्र, यावर आजपर्यंत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी यावर विषयावर भाष्य केलं आहे.
“सिंह घुसला थेट गावात अन् घडलं असं की…”, पाहा थरकाप उडवणारा Video
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या वादामुळे मनाला प्रचंड वेदना झाल्या असं राज ठाकरे म्हणाले आहेत. त्याचबरोबर इतकी वर्षे शिवसेना पाहिली, जगलो होतो. अनेकांच्या घामातून, रक्तातून शिवसेना उभी राहिली असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे शिवसेना आणि धनुष्यबाण हे गेल्यानंतर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.
गौतमी पाटील म्हणजे पावसाळ्यात उगवणारी छत्री; तमाशा परिषदेच्या अध्यक्षांनी केली जोरदार टीका
त्याचबरोबर राज ठाकरे पुढे म्हणाले, बाळासाहेबांशिवाय धनुष्यबाण कोणालाच झेपणार नाही. तो धनुष्यबाण नव्हता तर शिवधनुष्यबाण होता अस देखील राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात म्हटले आहे.
गौतमी पाटील म्हणजे पावसाळ्यात उगवणारी छत्री; तमाशा परिषदेच्या अध्यक्षांनी केली जोरदार टीका