
गाड्यांचे अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच जर डोक्यावर हेल्मेट नसेल तर बऱ्याचदा वाहन चालकाला जीव देखील गमवावा लागतो. अशातच रस्ते अपघात कमी करण्यासाठी दिल्लीतील एका तरुणाने पुढाकार घेतला आहे. नोएडा येथे राहणारा हा तरुण मागील दहा वर्षांपासून स्वखर्चातुन दुचाकी चालकांना हेल्मेट वाटप करत आहे. या तरुणाने आतापर्यंत तब्बल 56 हजार हेल्मेटचे ( Helmet) वाटप केले आहे.
आत्ताची सर्वात मोठी बातमी! राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा; मोदींवर टीका करणे पडले महागात
राघवेंद्र सिंह (Raghwendra Sinh) असे या तरुणाचे नाव असून तो 36 वर्षाचा आहे. या तरुणाने आतापर्यंत 30 लोकांचे प्राण वाचवले आहेत. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल परंतु लोकांना मोफत हेल्मेट वाटण्यासाठी त्याने स्वतःचे घर सुद्धा विकले आहे. खरंतर राघवेंद्र या तरुणाचा मित्र क्रिशन कुमार ठाकुर याचा एका रस्ते अपघातात मृत्यु झाला होता. स्वतःच्या मित्राला गमावल्याच्या दुखातून बाहेर न पडलेल्या राघवेंद्र यांनी रस्ते सुरक्षाविषयी जनजागृती करण्याचा निर्णय घेतला.
तेव्हापासून ते वाहतुकीचे नियम पाळा असे वाहन चालकांना सांगतात. तसेच चालकांना हेल्मेट घालावा याचा ते स्वता प्रचार आणि प्रसार करतात. विशेष म्हणजे यासाठी ते चारचाकी चालविताना सुद्धा हेल्मेट घालतात. राघवेंद्र यांच्या कार्यामुळे त्याला हेल्मेट मॅन म्हणून सुद्धा ओळखले जाते. लोकांना हेल्मेट देऊन त्यांचे रक्षण करण्यासाठी राघवेंद्र यांनी आपल्या बायकोचे दागिने सुद्धा गहाण ठेवले आहेत.