
निसर्गाचा समतोल बिघडल्याने जंगली प्राण्यांचे मानवी अधिवासात येण्याचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान मालेगाव ( Malegaon) परिसरात सतत बिबट्याचे दर्शन होत आहे. यामुळे शेतकरी चांगलेच हतबल झाले आहेत. एकीकडे शिवारात रात्री अपरात्री व दिवसा येणारा बिबट्या तर दुसरीकडे पिकांना पाणी देण्यासाठी महावितरण कडून होणारा रात्रीचाच वीजपुरवठा यामुळे शेतकरी त्रस्त आहेत.
गूगलवर ‘हे’ नंबर्स कधीच करू नका सर्च, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान
रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना बिबट्यांच्या भीतीने जीव धोक्यात घालून पाणी पाजावे लागते. यासाठी त्यांनी महावितरणकडे दिवसा थ्री फेज वीज पुरवठा देण्याची मागणी केली आहे. मात्र याकडे महावितरण कडून दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे. एवढेच नाही तर शेतकऱ्यांनी वनविभागाकडे ‘बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करावे’ अशी मागणी केली आहे. याकडे देखील वनविभागाने लक्ष दिलेले नाही.
रामदेव बाबा 100 तरुण तरुणींना देणार सन्यास; पाहा नेमकं काय आहे प्रकरण?
मालेगाव येथे उन्हाळा कांदा पिकाला पाणी भरत असलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने ( Leopard) हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली आहे. यावेळी वडिलांवर बिबट्याने हल्ला केल्याचे लक्षात येताच मुलाने प्रसंगावधान राखून धाव घेतली. त्यामुळे शेतकरी भरत अहिरे यांची बिबट्याच्या तावडीतून सुटका झाली आणि त्यांचा जीव थोडक्यात बचावला. या परिसरात अशा घटना सतत घडत असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना करायला हव्यात.
मुकेश अंबानींची मार्केट मध्ये नव्या प्रोडक्टसह उडी; साबण व इतर सेगमेंट मध्ये ठेवणार पाय!