खासदार उदयनराजे भोसले सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. ते त्यांच्या बेधडक वक्तव्यामुळे देखील चर्चेत असतात. उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले हे दोघे कायम एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. दरम्यान अलिकडेच शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याला आता उदयनराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
ब्रेकिंग! दिल्लीनंतर आता मध्यप्रदेशमध्ये भूकंपाचे धक्के
यावर प्रतिक्रिया देत उदयनराजे भोसले म्हणाले, “जर लोकांनी सांगितलं की, उदयनराजेंनी पैसे खाल्लेत तर मी मिशा काढून टाकेन.” तुम्ही समोरासमोर येऊन सांगा की आम्ही कुठे भ्रष्टाचार केलाय त्यावेळी खर असेल तर आम्ही मान्य करू.”
अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात धक्कादायक माहिती समोर! पोलीसही चक्रावले
ज्यावेळी माध्यमांचे प्रतिनिधी उदयनराजेंची प्रतिक्रिया घेत होते. त्यावेळी उदयनराजे म्हणाले की, “ माध्यमातील प्रतिनिधींनी हा माईक लोकांकडे द्या आणि त्यांना सांगू द्या की, उदयनराजेंनी पैसे खाल्ले आहेत. जर लोकांमध्ये कोणी बोललं की उदयनराजेंनी पैसे खाल्ले आहेत तर देवाशपथ सांगतो मिशा काय, भुवया पण काढून टाकेन, परत तोंड ताखवणार नाही.” असे देखील यावेळी उदयनराजे भोसले म्हणाले आहेत.
कांदा पिकाला पाणी देत असताना शेतकऱ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला!