
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आहे. यामुळे राहुल गांधी यांना मोठा धक्का बसल्याचे समजले जात आहे. सुरत कोर्टाने राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांना मानहानी प्रकरणात दोषी ठरवले असून त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर त्यांना जामीन देखील मंजूर झाला. मात्र दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान आता भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
“तरुण दारूच्या नशेत थेट आगीत पडला अन्…”, पाहा थरकाप उडवणारा Video
भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी राहुल गांधी यांना थेट पाकिस्तानात पाठवण्याची मागणी केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी ही मागणी केली आहे.
भर कार्यक्रमात गौतमी पाटीलला गडी भिडला; व्हिडीओ व्हायरल
माध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले, राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन देशाची बदनामी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना थेट पाकिस्तानात पाठवले पाहिजे, असे नितेश राणे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. त्यांच्या या विधानाची आता सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे.
रोहित शर्माची संपत्ती वाचून तुमचेही फिरतील डोळे! महिन्याला कमावतो ऐवढे कोटी…