मागच्या काही दिवसापासून चर्चेत असणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. इथून मागच्या दिवसात अर्थसंकल्प अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलाच गदारोळ झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळाले आहे. या अधिवेशनामध्ये विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यास एकही संधी सोडत नव्हते. आरोप प्रत्यारोप चालूच होते.
Airtel च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! फॅमिली प्लॅन लाँच, जाणून घ्या किंमत
दरम्यान, या चर्चेत असणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवट झाला आहे. आज शेवटच्या दिवशी राहुल गांधी यांचा मुद्दा अधिवेशनामध्ये चांगलाच रंगल्याचे चित्र पाहायला मिळाले. सकाळी अधिवेशन सुरु होण्याच्या आधीच महाविकास आघाडीतील आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून तोंडावर काळया पट्टया बांधून केंद्र सरकारचा निषेध केला आहे. राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर विधानसभेत चांगलाच गदारोळ झाला. प्रश्नांची उत्तरे द्यायला, मंत्री सभागृहात उपस्थित नसल्यामुळे विरोधक चांगलेच संतापले. यावेळी विरोधकांनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.
कपल फोटोशूटसाठी सासू-सासऱ्यांनी केली मदत! व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क
यामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, त्याचबरोअबर आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारवर जोरदार टीका केली आहे.
यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अजित पवार म्हणाले, “हे अधिवेशन माझ्या राजकीय कारकिर्दीतील पहिले अधिवेशन असेल. सभागृहात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री यांची उपस्थिती नगन्य होती. ज्यावेळी आम्ही सत्तेत होतो त्यावेळी आम्ही सभागृहात हजर राहायचो. आता देखील आम्ही रात्री ११ पर्यंत हजर राहत होतो. अस यावेळी अजित पवार म्हणाले आहेत.
जनावरांना ‘हे’ तीन प्रकारचे गवत द्या, दूध वाढीसाठी होईल फायदा; जाणून घ्या सविस्तर…
त्याचबरोबर पुढे ते म्हणाले, “आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री २९२ अंतिम आठवडा प्रस्ताव आणि १९४-३-४ चं उत्तर आज देत आहेत. महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासात असं कधीच झालं नाही. मी कोणावर आरोप करत नाही मात्र हा सरकारचा बेजबाबदारपणा असल्याचे पवार यावेळी म्हणाले आहेत.
तुळशीच्या पानांचे ‘हे’ उपयोग तुम्हाला माहीत आहेत का? अनेक आजार होतात झटक्यात दूर