राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आहे. यामुळे राहुल गांधी यांना मोठा धक्का बसल्याचे समजले जात आहे. सुरत कोर्टाने राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांना मानहानी प्रकरणात दोषी ठरवले असून त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर त्यांना जामीन देखील मंजूर झाला. मात्र दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. यामुळे राज्याचे राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे.
अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अजित पवारांनी व्यक्त केली खंत; म्हणाले…
या प्रकरणात अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्येच आता अभिनेत्री केतकी चितळे हिने देखील या प्रकरणावर भाष्य केलं आहे. केतकीने याबाबत एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये केतकीने राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासंदर्भात फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टमुळे तिच्यावर झालेली कारवाई, या दोन गोष्टींचा संदर्भ जोडला आहे. यामुळे आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
जनावरांना ‘हे’ तीन प्रकारचे गवत द्या, दूध वाढीसाठी होईल फायदा; जाणून घ्या सविस्तर…
केतकीने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिले की, “काही लोकांच्या मते राहुल गांधी यांना घाबरले म्हणून मानहानीचा खटला दाखल केला. या लॉजिकने लोक मलाही घाबरले होते का,?, असा सवाल केतकीने उपस्थित केला आहे. तिच्या या पोस्टनंतर केतकी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
तुळशीच्या पानांचे ‘हे’ उपयोग तुम्हाला माहीत आहेत का? अनेक आजार होतात झटक्यात दूर