मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत पुन्हा एकदा मोठी चूक; तरुणाने थेट…

Big news! Another big mistake in PM Modi's security; The young man directly…

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते ठिकठिकाणी रोड शो आणि सभा घेत आहेत. शनिवारी पीएम मोदी कर्नाटकातील दावणगेरे येथे रोड शो करत होते. दरम्यान, एका तरुणाने त्यांची सुरक्षा भंग करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राहुल गांधी प्रकरणात केतकी चितळेची उडी; शरद पवारांच्या ‘त्या’ प्रकरणाचा उल्लेख करत म्हणाली…

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय की, रोड शो दरम्यान पीएम मोदी रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या लोकांना हात दाखवून अभिवादन करत आहेत. त्याचवेळी एका तरुणाने सुरक्षा कठडे तोडून थेट त्यांच्या दिशेने धावण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधानांच्या दिशेने धावताना तो मोदी जी मोदी जी म्हणत आहेत.

अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अजित पवारांनी व्यक्त केली खंत; म्हणाले…

एएनआय या वृत्तसंस्थेने पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. माहितीनुसार, सुरक्षा कठडे तोडून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जाणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

जनावरांना ‘हे’ तीन प्रकारचे गवत द्या, दूध वाढीसाठी होईल फायदा; जाणून घ्या सविस्तर…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *