मुंबई | हल्ली महापुरुषांच्या नावावरुन राजकारणात (Politics) नेहमीच वाद होत असल्याचं पहायला मिळत आहे. सध्या राहुल गांधी यांची खासदारपदावरुन करण्यात आलेली हकालपट्टी आणि राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन महाराष्ट्र राज्यात चांगलचं वातावरण तापलेलं दिसून येत आहे.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची शनिवारी पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देतात माफी मागायला मी काही सावरकर नाही असं वक्तव्य केलं होत. उद्धव ठाकरेनींदेखील गांधींच्या या वक्तव्याचा निषेध केल्याचं पहायला मिळालं. सावकराबाबतीत करण्यात येणारे विधान खपवून घेतलं जाणार नाही असं पवित्रा ठाकरेंनी घेतला.
शाहरुख खानने खरेदी केली आलिशान गाडी; किंमत ऐकुण व्हाल थक्क
आता यामुळं काँग्रेस (Congress)आणि शिवसेनेत ठिणगी पडण्याची शक्यता आहे. अशातच खुद्द राष्ट्रवादीच सर्वेसर्वा शरद पवार उद्धव ठाकरेंसाठी मैदानात उतरले आहेत. दिल्लीत सर्वविरोधी पक्षाची बैठक पार पडली. यावेळी शरद पवारांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे आता सगळ्या प्रकरणाला फुल स्टाॅप लागण्याची शक्यता आहे.
सावरकर हे विज्ञानवादी होते. त्याचा आणि RSS चा काही संबध नाही आहे. त्यामुळं सावरकरांना माफीवीर म्हणून हिणवणं चुकीच असल्याचं पवार म्हणाले. महाराष्ट्रात सावरकरांच्या मुद्यावरुन महाविकास आघाडी होत आहे. असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. यावर बैठकीला उपस्थित खासदारांनीही सहमती दर्शवली.
टिळक कुटुंबाला कसब्यातील उमेदवारी न दिल्याबाबत चंद्रकांत पाटलांनी केला मोठा गौप्यस्फोट!
त्यावेळी पवारांच्या मताचा मी आदर करतो अशी कबुली काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान आता पवारांच्या या मध्यस्थीमुळं वाद मिटतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच राहुल गांधी आता सावरकर मुद्द्यावरुन पुन्हा भाष्य करणार नसल्याचं म्हटलं जात आहे.
मोठी बातमी! अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणातील आरोपी अनिक्षाला जामीन मंजूर