गिरीश बापट यांच्या जाण्यानं पक्षाचं मोठं नुकसान – विनोद तावडे

Girish Bapat's departure is a big loss for the party - Vinod Tawde

पुण्याचे माजी महापौर आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

गिरीश बापट यांच्या निधनाची माहिती मिळताच शरद पवार भावूक; म्हणाले…

याबाबत विनोद तावडे यांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे. ट्विट करत त्यांनी लिहिले की, माझे मित्र, सहकारी गिरीश बापट यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं, ही घटना अतिशय वेदनादायी आहे. त्यांच्या निधनाने पुणे शहराची आणि पक्षाचीही हानी झाली आहे, इतकंच नव्हे; तर त्याही पलीकडे जाऊन आम्ही सर्वांनी सुहृद, नेता गमावला आहे. गिरीशजी यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना…ओम शांती!

गिरीश बापट यांनी पुण्याच्या विकासात दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील – देवेंद्र फडणवीस भावुक

दरम्यान, त्यांच्यावर अंत्यविधी संध्याकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशान भूमीत होणार आहे. गिरीश बापट राजकारणामध्ये खूप सक्रिय होते. त्यांच्या निधनाने भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याच्या भावना राजकीय नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *