भारतीय संस्कृतीमध्ये रामनवमीला जास्त महत्त्व दिलं जातं. आज देशभर रामनवमीनिमित्त अनेक कार्यक्रम असतात नागरिंकामध्ये प्रचंड उत्साह पहायला मिळतो.या निमित्तानं विवध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहे. यामध्येच छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले.
हास्यजत्रा फेम गौरव मोरे सोबत सुजय विखे पाटील यांचा भन्नाट डान्स; पाहा Video
छत्रपती संभाजी नगर येथे राम मंदिरासमोर उभी असलेली वाहने काही आज्ञातांनी पेटवून दिली होती. यामुळे आजूबाजूच्या परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. ही घटना येथील किराडपुरा भागात रात्री एक दीडच्या सुमारास घडली आहे. आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
मोठी बातमी! रामनवमी उत्सवादरम्यान ‘या’ मंदिरात लागली भीषण आग; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई असून जवळपास तब्बल ४०० ते ५०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, जिनसी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.