राज्यात वातावरणामध्ये सतत बदल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या मार्च महिना म्हणजेच उन्हाळा हा ऋतू चालू आहे तरी देखील मागच्या काही दिवसापासून राज्याच्या विविध भागात पाऊस झाला आहे. राज्यात अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांना संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
सर्वांत मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा केल्याप्रकरणी ४०० ते ५०० जणांवर गुन्हे दाखल
हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज आणि उद्या दोन दिवस राज्याच्या विविध भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. त्याचबरोबर राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी असं आव्हान करण्यात येत आहे.
‘मी खेळायला येत आहे’ IPL 2023 सुरू होण्यापूर्वी ऋषभ पंतचा समोर आला एक व्हिडिओ
या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता –
मुंबईसह कोकणातील चार जिल्हे, विदर्भातील बुलढाणा ते गोंदिया, वाशिम ते गडचिरोली अशा 11 जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हास्यजत्रा फेम गौरव मोरे सोबत सुजय विखे पाटील यांचा भन्नाट डान्स; पाहा Video