गौतमी पाटीलने (Gautami Patil) संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. तरुणांपासून महताऱ्यांपर्यंत अनेक गौतमीचे चाहते आहेत. गौतमीचे अनेक ठिकाणी कार्यक्रम होत आहे. त्याचबरोबर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामध्ये तरुण मोठ्या प्रमाणात धिंगाणा करतात. गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि तरुणांचा गोंधळ हे समीकरण काही आपल्यासाठी नवीन नाही. गौतमीच्या कार्यक्रमात सतत गोंधळ होतच असतो.
कांद्याला अनुदान मिळण्याचा आज शेवटचा दिवस; पाहा काय आहेत कांद्याचे दर?
आता गौतमीच्या पारनेरमध्ये झालेल्या कार्यक्रमाची सोशल मीडियावर (Social media) चर्चा होताना दिसत आहे. पारनेर तालुक्यातील जवळे या गावामध्ये गौतमीच्या झालेल्या कार्यक्रमामध्ये तरुणांनी गोंधळ घातल्याचे दिसून आले आहे. इकडं गौतमीने नृत्य सुरु केलं अन् तिकडे तरुणांनी ओरडत, हातवारे करत, गोंधळ घातल्यानं कार्यक्रमाच्या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
‘भोला’ चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर आपटला! रामनवमीची सुट्टी असूनही थिएटर्स रिकामेच
दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून गौतमीच्या कार्यक्रमामध्ये तरुणांचे धुडगूस घालण्याचे प्रमाण वाढतच चालल्याचे दिसत आहे. एकीकडे गौतमीचे कार्यक्रम बंद करा अशी मागणी होत आहे तर दुसरीकडे तिच्या कार्यक्रमांमध्ये तरुणाईच्या उत्साहाला भलतेच उधाण आल्याचे देखील दिसून येत आहे.