विराट कोहली (Virat Kohli) सोशल मीडियावर (Social media) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. मैदानावर चौकार आणि षटकार (Fours and sixes) मारून सर्वांची मने जिंकणाऱ्या कोहलीने सध्या सोशल मीडियावर त्याची दहावीची मार्कशीट शेअर केली आहे. ही मार्कशीट काही वेळातच व्हायरल झाली आहे.
“..अन् गौतमीने त्याला भर कार्यक्रमात किस केलं”; व्हिडिओ झाला व्हायरल
किंग कोहलीने शेअर केलेल्या मार्कशीटमध्ये एकूण 5 विषय आहेत. त्याला इंग्रजीत 83, हिंदीत 75 गुण, गणितात सर्वात कमी 51 गुण, विज्ञानात 55 गुण, सामाजिक शास्त्रात 81 गुण, ऐच्छिक विषयात त्याला एकूण 74 गुण मिळाले आहेत.
मोठी बातमी! महिंद्राने 1 लाख थार बनवण्याचा टप्पा पार केला
विराट कोहली हा जगाचा प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे. आपल्या निष्ठेने आणि मेहनतीने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जगातील अनेक क्रिकेटपटूंवर त्याचा प्रभाव आहे. अशा परिस्थितीत त्याने सोशल मीडियावर दहावीची मार्कशीट शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. त्यामुळे त्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. नेटकरी देखील यावर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.