मुंबई : प्रसिद्ध टिकटॉक स्टार व भाजपा नेत्या सोनाली फोगट (Sonali Phogat) यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. वयाच्या ४१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आज काळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. प्राथमिक माहितीनुसार, त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे.
माहितीनुसार, सोनाली फोगट या त्याच्या काही कामानिमित्त गोव्याला गेल्या होत्या. गोव्याचे त्यांनी इन्स्टाग्रामवर (Instagram) काल रात्री काही व्हिडीओ आणि फोटोही शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आणि व्हिडिओमध्ये त्या खूप सुंदर दिसत होत्या. पण आज सकाळच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका होऊन त्यांचा मृत्यू झाला.
Uday Samant : उदय सामंत, यशवंत जाधव यांची शिवसेनेतून हकालपट्टी; वाचा सविस्तर
सोनाली फोगट यांना टिकटॉक (TikTok) स्टार म्हणून ओळखले जायचे. त्यांनी छोट्या पडद्यावरील अनेक सुप्रसिद्ध मालिकांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. सोनाली फोगट सोशल मीडियावर खूप सक्रिय असायच्या. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असायचे. त्यांनी बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या १४ व्या पर्वात देखील सहभाग घेतला होता. त्याचबरोबर २०१९ च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपामध्ये देखील प्रवेश केला.