आज (2 एप्रिल) छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Naga) महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) सभा होत आहे. या सभेला महाविकास आघाडीतीमधील सर्व प्रमुख नेते उपस्थित आहेत. यावेळी अजित पवार यांनी सरकारवर वेगेवेगळ्या मुद्द्यांवरून जोरदार टीका केली आहे..
मविआच्या वज्रमुठ सभेतून अजित पवार कडाडले; म्हणाले, “धमक असेल तर…”
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, मागच्या काही काळामध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला. त्याचबरोबर अनेक महापुरुषांचा देखील अवमान केला. त्यावेळी यांच्या सरकारमधील नेत्यांची दातखिळी बसली होती का, असासवाल अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला.
सर्वात मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बच्चू कडू यांचे मोठे वक्तव्य
मागच्या दोन तीन दिवसापूर्वी संभाजीनगरमध्ये दोन गटात तुफान राडा झाला होता. यावर बोलताना अजित पवारांनी सरकारला लक्ष केलं आहे. अजित पवार म्हणाले. महाविकास आघाडीची सभा होऊ नये, यासाठीच छत्रपती संभाजीनगरमध्ये राडे केले जातायंत. या ठिकाणच वातावरण खराब केलं जात असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.
छोटू दादा झाला आचारी अन् पाच रुपयांना विकली बिर्याणी थाळी! पाहा व्हायरल Video
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारवर हल्लाबोल –
शेतकऱ्यांच्या कांद्याला, कापसाला कवडीमोल दर मिळत आहे. कष्ट करून शेतकऱ्याला हातात फक्त १ किंवा दोन रुपया मिळत आहे. उत्पादन खर्च देखील निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा, कापूस प्रश्नावर शिंदे-फडणवीस सरकार भूमिकाच घेत नसल्याचं देखील अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.