समृद्धी महामार्गावरील (Prosperity Highway) अपघाताची (accident) मालिका काही संपण्याचा नाव घेत नाही. सतत या महामार्गावर अपघात घडत आहेत. वाहनाचे टायर फुटून, वन्यप्राणी आडवे येऊन समृद्धी महामार्गावर अनेक अपघात होत आहेत. दरम्यान सध्या समृद्धी महामार्गावर ट्रकला भरधाव कारने मागून धडक देऊन भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
“…त्यावेळी यांची दातखिळी बसली होती का? अजित पवारांचा हल्लाबोल
माहितीनुसार, वर्धा (Wardha) जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील महाबळा परिसरात समृद्धी महामार्गांवर हा भीषण अपघात झाला आहे. . या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गाने नागपूरच्या दिशेने जातं असलेल्या ट्रकला कारने मागून धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील दोन डॉक्टर मैत्रिणींसह एकाचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. डॉ. ज्योती क्षीरसागर, डॉ. फाल्गुनी सुरवाडे आणि भरत क्षीरसागर अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. ही घटना रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली आहे
मविआच्या वज्रमुठ सभेतून अजित पवार कडाडले; म्हणाले, “धमक असेल तर…”