मागील अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आयोध्या दौरा चर्चेत आहे. शिवसेनेतील आमदार व खासदारांसह मुख्यमंत्री हा दौरा करणार आहेत. ९ एप्रिलला एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
भीषण अपघात! दोन डॉक्टर महिलांसह एकचा जागीच मृत्यू
या आयोध्या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री शरयू नदीच्या काठी काही धार्मिक विधींमध्ये सहभाग घेणार आहेत. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) पहिल्यांदाच अयोध्येला ( Aayodhya) जाणार आहेत. याआधी ते राजकीय बंडखोरी करण्याआधी आदित्य ठाकरे यांच्या सोबत आयोध्या दौऱ्यावर गेले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“…त्यावेळी यांची दातखिळी बसली होती का? अजित पवारांचा हल्लाबोल
त्याचबरोबर याबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “अयोध्येतील राम मंदिराचे बाळासाहेबांचे स्वप्न होते, ते आता नरेंद्र मोदी पूर्ण करत आहेत. यामध्ये खारीचा वाटा म्हणून आम्ही सागाची लाकडे मंदिरासाठी पाठवली आहेत. मंदिर निर्माणाधीन भागातही भेट देणार असल्याचे यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.