
आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबत एक आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. आता शिरसाट यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे (Sushma Ahndhare) यांच्याबाबत वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
उर्फीने किवी फळापासून बनवला ड्रेस; सोशल मीडियावर होतेय चर्चा; पाहा व्हिडीओ
आमदार शिरसाट यांनी माझ्याबाबत वक्तव्य करताना जी चुकीची भाषा वापरली. माझी बदनामी केली. आता या प्रकरणी मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. पत्रकारांशी बोलताना त्या हे म्हणाल्या आहेत. सध्या त्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
“…तर सावरकरांना भारतरत्न द्या”, अजित पवारांच्या वक्तव्याला भाजपाचं प्रत्युत्तर; म्हणाले…
सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना संजय शिरसाट यांनी लफडेबाज असा उल्लेख केला होता. आता या प्रकरणी ठाकरे गट देखील चांगलाच आक्रमक झाला आहे. त्यामुळे आमदार संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
फेसबुकवरील बर्थडे नोटिफिकेशने कंटाळला आहात? ‘या’ पद्धतीने करा नोटिफिकेशन बंद