
गिरीश बापट यांच्या निधनाने पुण्यातील लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे पुण्यातील लोकसभेच्या पोटनिवडणुकीवर सध्या प्रचंड चर्चा सुरु आहेत. दरम्यान, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती.
उर्फीने किवी फळापासून बनवला ड्रेस; सोशल मीडियावर होतेय चर्चा; पाहा व्हिडीओ
यावेळी त्यांनी पुण्यातील पोटनिवडणुकीवर भाष्य केलं आहे. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते एकत्र बसून निर्णय घेणार असल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले.
“…तर सावरकरांना भारतरत्न द्या”, अजित पवारांच्या वक्तव्याला भाजपाचं प्रत्युत्तर; म्हणाले…
अजित पवार पुढे म्हणाले, या विषयावर आता चर्चा करण योग्य नाही त्यामुळे वेळ आल्यावर या विषयावर चर्चा करू. आजच मला चंद्रकांत पाटलांचा फोन आला होता. ते म्हणाले, ७ तारखेला दिवंगत खासदार गिरीश बापट यांची श्रद्धांजलिची घेण्यात येणार असून त्यासभेला नितीन गडकरी येणार आहेत.
फेसबुकवरील बर्थडे नोटिफिकेशने कंटाळला आहात? ‘या’ पद्धतीने करा नोटिफिकेशन बंद