शेतकऱ्यांची लूट थांबवा, राऊतांचे थेट उपमुख्यमंत्र्यांना पत्र

Stop looting farmers, Rauta's letter directly to Deputy Chief Minister

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक पत्र लिहिलं आहे. यामधून त्यांनी भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांची लूट थांबवण्याची विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

भोला चित्रपटाने चार दिवसांत कमावला तब्बल ‘इतक्या’ कोटी रुपयांचा गल्ला

पाहा राऊतांनी काय म्हंटल आहे पत्रात?

जय महाराष्ट्र!

आताच (१ एप्रिल) मी आपले एक विधान ऐकले व गृहमंत्री म्हणून आपला अभिमान वाटला. आपण म्हणता, “मी गृहमंत्री झाल्यापासून अनेकांची अडचण झाली आहे. बेकायदेशीर कामे करणाऱ्यांना मी सोडणार नाही व त्यांच्यावर कठोर कारवाई करणार म्हणजे करणार!” देवेंद्रजी आपण घेतलेल्या या भूमिकेबद्दल आपले कौतुक करावे तेवढे थोडेच, पण आपण जे बोलत आहात तसे महाराष्ट्रात खरोखरच घडते आहे काय? आपल्या सरकारमधील अनेकांची बेकायदेशीर कृत्ये व लांड्यालबाड्या याबाबत करवाई करण्याबाबत मी आपल्याकडे पुराव्यांसह येऊन भेटू इच्छितो. गेल्या चार महिन्यांपासून आपण मला याबाबत भेट देण्यास टाळाटाळ करीत आहात.

भोला चित्रपटाने चार दिवसांत कमावला तब्बल ‘इतक्या’ कोटी रुपयांचा गल्ला

मी खालील भ्रष्टाचार व बेकायदेशीर प्रकरणांबाबत आपली भेट घेऊ इच्छितो –

१) भाजपचे आमदार सन्माननीय श्री. राहुल कुल यांच्या नेतृत्वाखालील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात (ता. दौंड) प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. शेतकऱ्यांच्या पैशांची अक्षरशः लुटमार झाली असून किमान ५०० कोटींचे मनीलाँडरिंग झाल्याचे पुरावे समोर आले आहेत. संबंधित कारखान्यांचे पदाधिकारी व शेतकरी प्रतिनिधी यांच्यासह मी आपली या बेकायदेशीर प्रकरणावर कारवाई व्हावी म्हणून भेट घेऊ इच्छितो.

पीकअप आणि इनोव्हा कारचा भीषण अपघात; ३ जण जागीच ठार

२) आपल्या मंत्रिमंडळातील श्री. दादा भुसे (मालेगाव) यांनी ‘गिरणा अॅग्रो’ नावाने १७८ कोटींचे २५ लाख शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा केले. गिरणा कारखाना वाचविण्यासाठी श्री. भुसे यांनी हे पैसे गोळा केले. या रकमेचा अपहार झाला असून कंपनीच्या वेबसाईटवर केवळ १ कोटी ६७ लाखांचे शेअर्स फक्त ४७ शेतकऱ्यांच्या नावावर दाखवले. या अशा भ्रष्टाचारी कृत्याबाबत कोणालाही पाठीशी न घालण्याचे आपले धोरण असायला हवे. व त्या भ्रष्टाचाराबाबत मी आपणास अधिक माहिती देऊ इच्छितो.

धक्कादायक घटना! बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ गंभीर जखमी

३) किरीट सोमय्या यांनी ‘विक्रांत’ युद्ध नौका वाचविण्यासाठी जनतेकडून पैसे जमा केले. त्याचाही हिशेब दिलेला नाही. उलट राज्यात तुम्ही गृहमंत्री होताच मुंबई पोलिसांनी या गुन्ह्याची चौकशी थांबवून सोमय्या यांना ‘क्लीन चिट’ दिली हे धक्कादायक आहे. अशा सर्व बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करून जनतेच्या पैशांवर सुरू असलेली दरोडेखोरी थांबवावी, अशी माझी विनंती आहे.

IPL 2023: ऋतुराज गायकवाडचे तुफानी अर्धशतक, पाहा Video

वरील बेकायदेशीर प्रकरणांबाबत पुरावे सादर करण्यासाठी मी आपणास भेटू इच्छितो. कृपया आपल्या सोयीची वेळ कळवावी! असे पत्र खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *