
सध्या एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या ताडदेव (Tardeo News) भागात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (Nationalist Youth Congress Workers) तीन कार्यकर्त्यांवर 30 ते 40 जणांनी तलवारीनं हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली आहे.
चिंताजनक! साताऱ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली; मास्क वापरण्याची सक्ती
या घटनांमध्ये ३० ते ४० जणांनी तीन कार्यकर्त्यांवर हल्ला केला यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. आता हल्ला नेमका कोणत्या कारणाने करण्यात आला हे समजू शकले नाही. याबाबत तपास पोलीस यंत्रणा करत आहे.
शेतकऱ्यांची लूट थांबवा, राऊतांचे थेट उपमुख्यमंत्र्यांना पत्र
घटना घडली अशी की, ताडदेवच्या जनता नगरमधील एका बिल्डिंगमध्ये 30 ते 40 अज्ञात लोक तलवारी घेऊन घुसले. आणि त्यांनी बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या तीन कार्यकर्त्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. त्याचबरोबर ताडदेव पोलिसांनी (Tardeo Police) आतापर्यंत याप्रकरणी 3 जणांना अटक देखील केली आहे.
भोला चित्रपटाने चार दिवसांत कमावला तब्बल ‘इतक्या’ कोटी रुपयांचा गल्ला