मागच्या काही दिवसापूर्वी एका कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये इंदुरीकर महाराजांनी गौतमी पाटीलवर जोरदार टीका केली होती. ते म्हणाले होते, “आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला असा आरोप होतोय. मात्र, गौतमी हिने तीन गाणे वाजविले की तीन लाख रुपये मोजतात. तिच्या कार्यक्रमात मारामारी, चेंगराचेंगरी होते. आम्हाला मात्र टाळ वाजवून देखील काहीही मिळत नाही. साधं संरक्षण देखील दिले जात नसल्याचं इंदुरीकर महाराज म्हणाले होते.
चिंताजनक! कोरोनाच्या चौथ्या लाटेचे होतेय आगमन?
इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या टीकेनंतर गौतमी पाटील हिने कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता त्यांच्या टीकेवर गौतमी पाटीलने प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना गौतमी पाटील म्हणाली, ” ते महाराज आहे आता त्यांच्याविषयी मी काय बोलणार. महाराजांचा फक्त गैरसमज झाला असून ते सांगतात तेवढं मानधन नाही. हे प्रेक्षकांनी लक्षात ठेवाव असं गौतमी म्हणाली आहे.
तब्बल १२ तास पाण्यावर तरंगले बाबा, पाहण्यासाठी लोकांनी विहिरीजवळ केली तुफान गर्दी
त्याचबरोबर गौतमी पुढे म्हणाली, जर मी तिन गाण्याला तीन लाख रुपये घेतले असते माझे कार्यक्रमच झाले नसते. आमची २० जणांची टिम आहे याचा खर्च देखील मोठा आहे. त्यामुळे मानधन आम्ही घेतो. पण महाराज सांगतात तेवढं घेत नाही. आणि कोणही तीन गाण्यासाठी तीन लाख रुपये देणार नाही. असं देखील गौतमी यावेळी म्हणाली आहे.
“महिला स्कुटी चालवत होती मागे लागले भटके कुत्रे, अन् पुढे घडलं की…” पाहा थरकाप उडवणारा Video