सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Social activist Tripti Desai) सोशल मीडियावर (Social media) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतात. त्याचबरोबर त्यांच्या स्पष्ट वक्तव्यामुळे त्यांना ओळखले जाते. दरम्यान, तृप्ती देसाई आता राजकारणात येणार असल्याचं चित्र दिसून येत आहे.
इंदुरीकर महाराजांच्या ‘त्या’ टीकेचा गौतमीने घेतला समाचार; म्हणाली, “महाराज फक्त…”
यामध्येच आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी बारामती लोकसभा निवडणूक (Baramati Lok Sabha Election) लढण्याची तयारी देखील सुरु केली आहे. याबाबत बोलताना तृप्ती देसाई म्हणाल्या, गेली 15 वर्षे बारामतीमध्ये घराणेशाहीच सुरु आहे. खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी कार्यकर्त्यांचा कधीच विचार केला नाही असं त्या म्हणाल्या आहेत. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. अनेक तर्कवितर्क देखील लावले जात आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघात जनतेला बदल हवा असल्याचं तृप्ती देसाई यांनी म्हंटलं आहे. यामुळे आता त्या भाजपामध्ये प्रवेश करणार का अशा जोरदार चर्चा रंगल्या आहेत. त्याचबरोबर आम आदमी पार्टीकडून देखील तृप्ती देसाई यांना पक्षात येण्याची ऑफर आली आहे.